Home Breaking News LCB ने आवळल्‍या रेती तस्‍करांच्‍या मुसक्‍या

LCB ने आवळल्‍या रेती तस्‍करांच्‍या मुसक्‍या

● 16 लाखाचा मुददेमाल जप्‍त ● दोन टिप्‍पर सह दोघे ताब्‍यात

C1 20240207 19400297

16 लाखाचा मुददेमाल जप्‍त
दोन टिप्‍पर सह दोघे ताब्‍यात

WANI NEWS : पांढरकवडा हद्दीत मोठया प्रमाणात रेतीची तस्‍करी होत असल्‍याची गोपनिय माहिती LCB च्‍या पथकाला मिळाली. या आधारे गोंडवाकडी शिवारातील रोडवर सापळा रचला असता दोन टिप्‍पर सह दोघांना ताब्‍यात घेत 16 लाख 48 हजाराचा मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई 7 फेब्रुवारीला दुपारी दिड वाजता करण्‍यात आली. 16 lakh 48 thousand was seized after arresting both of them.

पांढरकवडा हद्दीत अवैधरित्‍या रेतीची वाहतुक मोठया प्रमाणात होत आहे. शासनाच्‍या महसुलांवर दरोडा टाकणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्‍यासाठी LCB पथक सज्‍ज झाले आहे. महसुल प्रशासनाच्‍या नाकावर टिच्‍चून गौण खनिजांची सातत्‍याने तस्‍करी होत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला रेती तस्‍करी होणार असल्‍याची “टिप” मिळाली. पथकाने गोंडवाकडी शिवारात सापळा रचला असता टिप्‍पर क्रमांक MH-40-BL-4462 व MH- 31- CB- 8052 यातील एक सहा चाकी टिप्पर थांबविण्याचा प्रयत्न केला. माञ सदर टिपर चालकाने हायवे रोडने असलेल्या सागर हॉटेल चे दिशेने वाहन वळवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे त्याचे मागे येणाऱ्या दुसऱ्या टिपरने सुध्दा त्याच टिप्पर मागे पळुन जाण्याचा प्रयत्न केला.

Img 20250103 Wa0009

LCB पथकाने दोन्‍ही टिप्‍परचा पाठलाग करुन वाहनांची झाडाझडती घेतली. यावेळी त्‍यात 48 हजारा रुपयांची एकुन 8 ब्रास रेती आढळुन आली. तर वाहन चालक लिंकेश्वर महादेव मरापे (52) वर्षे, रा. निलजई ता. केळापुर व प्रमोद महादेव जुनघरे (25) वर्षे, रा. कॉधारा ता. केळापुर यांना ताब्‍यात घेत विचारणा केली असता त्‍यांचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना आढळुन आला नाही. त्‍यांचेवर भादवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड,  अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, (LCB) आधारसिंग सोनोने, API अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके यांनी केली.
ROKHTHOK NEWS