Home Breaking News cricket : अंतिम सामन्याचे, थेट लाईव्ह प्रक्षेपण

cricket : अंतिम सामन्याचे, थेट लाईव्ह प्रक्षेपण

● मनसेची क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी

809
C1 20231116 19331557

मनसेची क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी

MNS NEWS | तरुणाईचा उत्साह द्विगुणित व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर सातत्याने प्रयत्नशील असतात. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामना 19 नोव्हेंबर ला होत आहे. अंतिम सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. The live broadcast of the final match will be a treat for cricket lovers.

Img 20250422 wa0027

भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक दिली आहे. आज होत असलेल्या सामन्यातील विजयी संघासोबत (final match) अंतिम सामना होणार आहे.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य एलईडी व्हिडीयो वॉल लावण्यात येणार आहे. सोबतच DJ साऊंड सिस्टीम व लाईट्सद्वारे सादरीकरण करण्यात येणार असल्याने क्षणाक्षणाला थरार अनुभवायला मिळणार आहे.

तरुणाईला क्रिकेट सामन्याचे प्रचंड आकर्षण आहे. मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना बघताना युवकांमध्ये जल्लोष संचारणार आहे. त्यातच भारतीय संघाने चौकार व षटकार मारल्यावर किंवा विकेट घेतल्यावर फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. तरी सर्व क्रिकेप्रेमींनी या अविस्मरणीय प्रसंगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
Rokhthok News