Home Breaking News कामाचा माणूस…. पथनाट्यातून कार्याचा जागर

कामाचा माणूस…. पथनाट्यातून कार्याचा जागर

● सामाजिक कार्याची आठवण ● तुरुंगवारीचा क्षण रोमांचक

687
C1 20241109 12414137

सामाजिक कार्याची आठवण …  तुरुंगवारीचा क्षण रोमांचक

Political News : राजकिय रणसंग्रामात विविध राजकीय पक्षाचे उमेदवार आपणच कसे ग्रेट आहोत हे पटवून देतात. मतदारांनी आपल्याला का निवडून द्यावं यासाठी उमेदवार विविध फंड्यांनी मतदारांना साद घालतो. मात्र या सर्वांमध्ये चर्चा होत आहे ती “कामाचा माणूस” या पथनाट्याची. मनसे नेते राजू उंबरकर यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची, तुरुंगवारीच्या क्षणाची झलक रोमांचक पद्धतीने पथनाट्यातून उलगडली. Man of work…. Jagar of work from street theater

Img 20250422 wa0027

वणी शहरातील काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकत्र आलेत. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजीव उंबरकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर पथनाट्याचे आयोजन केले. गावोगावी पथनाट्यातून गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा, अडल्या नडलेल्यांचा, पीडितांचा कैवारी केवळ राजू उंबरकर हेच असल्याचा जागर करण्यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. महिला-भगिनी, तरुण-तरुणी, युवकांची फौज प्रचार यंत्रणेत उतरली आहे. त्यातच पथनाट्य सादर करणारे प्रदीप गुप्ता, जतिन राऊत, वैभव पुराणकर, नचिकेत गायकवाड, शितल पिंपळशेंडे, स्वरा उइके, हर्षल ईखारे, योगेश तुराणकर हेतरुन-तरुणी सहभागी झाले आहेत.

पथनाट्यात उंबरकर यांनी आजवर केलेले सामाजिक उपक्रम आणि राजकीय आंदोलन यांची इत्यंभूत माहिती देण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांसाठी ऐन दिवाळीत भोगलेल्या कारावासाचा क्षण अंगावर काटा उभा करणारा आणि काळजाला भिडणारा आहे.
ROKHTHOK NEWS