Home Breaking News Manse Dahi handi | शुक्रवारी सिने तारका माधुरी पवार वणीत

Manse Dahi handi | शुक्रवारी सिने तारका माधुरी पवार वणीत

● 30 ऑगस्टला मनसे दहीहंडी चे आयोजन ! ● विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी

C1 20240828 09425813

30 ऑगस्टला मनसे दहीहंडी चे आयोजन !
विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी

MNS NEWS | कृष्ण जन्माष्टमी पासून संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी मध्येही मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. दिनांक 30 ऑगस्टला हा कार्यक्रम होणार असून मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आयोजन केले आहे. यावेळी विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती असणार आहे. On behalf of Maharashtra Navnirman Sena, MNS has also organized Dahihandi festival in Wani.

मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातही दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरी करण्याची प्रथा सुरू झाली आहे. शुक्रवारी शासकीय मैदानावर, दहीहंडीचा थरार वणीकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली आहे.

विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी असून विविध ठिकाणची गोविंद पथके दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजे पर्यंत या दहीहंडीचा थरार नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सर्व वणीकर नागरिकांनी दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी यावे असे आवाहन उंबरकर यांनी केले आहे.
ROKHTHOK NEWS

Img 20250103 Wa0009