● भालर येथील दुर्दैवी घटना
Sad News :
वणी तालुक्यातील भालर येथील एका विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी 8:30 वाजता उघडकीस आली. मृतक विवाहितेचे नाव संध्या जेऊरकर (45) असे असून ती भालर येथे वास्तव्यास होती. Married woman commits suicide by consuming poison
घटनेच्या दिवशी विवाहितेने शेजारच्या शेतात जाऊन विष प्राशन केले. बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्या शेतात अचेत अवस्थेत आढळून आल्या. पारिवारिक मंडळींनी तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. तपासणी अंती डॉक्टरांनी संध्या यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, त्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, डॉक्टरांनी याबाबतची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
Rokhthok






