
● प्रवीण खानझोडे यांनी पक्षाला रामराम केल्याने पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर..!
Political News :
संघटनात्मक बांधणी करताना स्थानिक नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागते. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेताना नाराजीचा सूर उमटतो. स्थानिक पातळीवर कार्यरत आमदार संजय देरकर यांचे खंदे समर्थक प्रवीण खानझोडे यांनी पक्षाला अधिकृतपणे जयमहाराष्ट्र केल्याने पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. MLA Dekar’s supporters shout “Jai Maharashtra” to Shiv Sena
मागील काही वर्षांपासून शिवसेना (उबाठा गट) मध्ये सक्रिय असलेले खानझोडे यांनी काही वर्षांपूर्वी आ. संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी ते बहुजन समाज पक्षात होते त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची पत्नी वृषाली खानझोडे ह्या पंचायत समिती सदस्य सुध्दा होत्या.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे संजय देरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये देरकर यांचा स्वतःचा असलेला जनाधार, शिवसेना (उबाठा) यांची ग्रामीण भागात असलेली ताकद व मविआ चे घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची मिळालेली साथ जमेची बाजू ठरली.
वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारणी जाहीर केली. नव्या-जुन्या कार्यकर्त्याची वर्णी लागली. खानझोडे यांच्या सौभाग्यवती वृषाली खानझोडे यांना सुद्धा महिला आघाडीत स्थान देण्यात आले. मात्र ते पदच स्वीकारले नसल्याचा दावा प्रवीण खानझोडे यांनी केला आहे.
आमदार संजय देरकरांचा खंदा समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांने पक्षाला जयमहाराष्ट्र केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच नाराज कार्यकर्त्यांचा “पोळा” फुटतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना उबाठा गटासाठी आगामी काळ डोकेदुखीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
Rokhthok