Home Breaking News mns aggressive : ही फक्त चेतावणी नव्हे, तर इशारा !

mns aggressive : ही फक्त चेतावणी नव्हे, तर इशारा !

● उंबरकरांचा रुद्रावतार, अधिकारी बिथरले

C1 20250530 17535323

उंबरकरांचा रुद्रावतार, अधिकारी बिथरले

MNS NEWS |
मनसे नेते राजू उंबरकर यांनी पुन्हा एकदा प्रशासनाची गाढ झोप उडवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून उंबरकरांनी थेट विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात अधिकारी गायब! यामुळे उंबरकरांनी चक्क एक तास कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून धरणे आंदोलन केले. Umbarkar sat on the steps of the office and staged a sit-in protest for an hour.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफुली पर्यंतचा रस्तावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान सहान अपघात होत आहे. तर नागरिकांना मोठी कसरत करत या रस्त्यातून वाट काढावी लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. खड्डयात साचलेल्या पाण्यात कमळाचे फुल सोडून निषेध नोंदवला.

C1 20260430

ही घटना म्हणजे फक्त निषेध नव्हे, तर एक प्रकारची ‘जाग आणणारी वज्रघात’ ठरली. उप अभियंता केतन परतानी व अभियंता हितेश राठी यांना कार्यालयात हजर होईपर्यंत उंबरकरांनी मागे हटण्याचे नाव घेतले नाही.

Img 20250103 Wa0009

एकदा अधिकारी समोर आले, की उंबरकरांनी त्यांना थेट रस्त्यावर नेत कामाच्या विलंबावर खरमरीत शब्दांत सुनावले. या साऱ्या गदारोळात आमदार संजय देरकर यांना सुद्धा बोलावण्यात आले. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून, दोन दिवसात काम सुरू होईल अशी ग्वाही दिली.

विशेष म्हणजे, आंदोलनाच्या शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याला शाल व श्रीफळ अर्पण करत ‘उपासात्मक’ नम्रता दाखवली. पण उंबरकरांनी संबंधितांना इशारा देत “कामात दिरंगाई नको, नाहीतर पुढचं आंदोलन अजून दणक्यात होईल असे सुनावले !”

बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या खड्डयात बसत कृत्रिम कमळाचे फुले सोडली. आंदोलन बराच वेळ चालल्याने काही काळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. सदर आंदोलनांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा साधत. दोन दिवसात रस्त्याची डागडुजी करत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची लेखी माहिती दिली.
Rokhthok News

Previous articleअपघातात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Next articleMD Drugs : शहरात शिरकाव, तिघांवर गुन्हा नोंद
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.