Home Breaking News MNS DAHIHANDI : मुंबईचा गोविंदा पथक ठरला ‘अव्‍वल’

MNS DAHIHANDI : मुंबईचा गोविंदा पथक ठरला ‘अव्‍वल’

● प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी तरुणाईला पाडली भुरळ....

1775

तरुणाई सह महिला थिरकल्या डिजेच्या तालावर

WANI MNS NEWS | पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वणी शहरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळाले. शासकीय मैदान, वणी याठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळाला. तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी मनसे रोजगार मेळावा 2023 ची घोषणा करण्यात आली. Dahi Handi was celebrated with great enthusiasm in Wani city through Maharashtra Navnirman Sena.

Img 20250422 wa0027

c1_20230912_13255461

गोपाळकालानिमित्त सोमवारी वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले होते. यानिमित्ताने प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थिती दर्शविली होती. या दहीहंडीसाठी प्रथम बक्षीस 2 लाख 50 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 1 लाख रुपये, तृतीय बक्षीस 50 हजार रुपये होते.

Img 20250103 Wa0009

c1_20230912_13263587

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील नामांकीत गोविंदा पथकांना निमंत्रित केले. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांना विशेष आसन व्यवस्था आणि ए.आर रहमान यांच्या कार्यक्रमात वापरात असणारी म्युझिक साऊंड सिस्टम असल्याने तरुणांनी तसेच महिला भगिनींनी नाचण्याचा आनंद घेतला.

विविध जिल्ह्यातील विजेत्या गोविंदा पथकांना बक्षीस मानधन सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या शुभहस्ते आणि मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले. प्रथम क्रमांक मुंबई येथील पथकाने पटकाविला.

वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी 16 सप्टेंबर पासून मनसे रोजगार मेळावा 2023 ची पक्षनेते राजू उंबरकर यांनी घोषणा केली. ही दिवाळी वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांसाठी खास असणार आहे. 5 हजार पेक्षा अधिक युवकांना नामवंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष,  कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित सर्वांचे राजू उंबरकर यांनी आभार मानले.
ROKHTHOK NEWS