
● मार्डी – मारेगाव बस सेवा सुरू करा
● मनसे आक्रमक, आगार व्यवस्थापकांना निवेदन
Maregaon News | तालुक्यातील अनेक गावातून शहरात शिक्षणासाठी विद्यार्थी ये-जा करतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात की काय अशी शंका यायला लागली आहे. बसफेरी अभावी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे कळताच मनसे आक्रमक झाली असून मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. As per the orders of MNS leader Raju Umbarkar, he takes the posture of agitation from time to time..
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेवर अनेक मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील विवीध मार्गावर विद्यार्थांच्या होत असलेल्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळोवेळी आंदोलनात्मक पवित्रा घेताहेत.
मारेगाव तालुक्यातील मार्डी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळेवर बस सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी आगार व्यवस्थापकांना केली आहे.
याप्रसंगी आजीद शेख ,शम्स सिद्धीकी, सय्यद युनुस, अयाज खान, उदय खिरटकर,अनंता जुमडे, गणेश क्षीरसागर, रोहित हस्ते, शुभम दाते यांचेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक तथा शाळकरी विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
Rokhthok News