Home Breaking News मनसेचा दणका…सोयाबीन घेण्यास नाफेडला भाग पाडले

मनसेचा दणका…सोयाबीन घेण्यास नाफेडला भाग पाडले

1044
C1 20241112 16274862

त्रुटी दाखवून माल करत होते परत

Political News | मंगळवारी येथील नाफेड मध्ये सोयाबीनची खरेदी चालू झाली. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणल्या नंतर त्यात जास्तं आर्द्रता ( मॉयश्चर) दाखवून व अन्य त्रुटी दाखवून तो माल वापस करण्यात येत होता. ही बाब मनसे नेते राजु उंबरकर यांना कळताच मनसेचे पदाधिकारी थेट बाजार समितीत पोहचले. आपला हिसका दाखवताच नाफेडणे नियमानुसार खरेदी सुरू केली आहे. MNS’s bump…forced Nafed to buy soybeans

Img 20250422 wa0027

मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात सारे पक्ष आणि उमेदवार मश्गुल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने शेतकऱ्यांचा सुखदुःखात सोबत असल्याचे पुन्हा प्रकर्षाने दिसले. बाजार समितीत 5 ते 6 वाहनातून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला आणले होते.

Img 20250103 Wa0009

नाफेडचे कर्मचारी शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या सोयाबीन मध्ये जास्तं आर्द्रता ( मॉयश्चर) दाखवून व अन्य त्रुटी दाखवून तो माल वापस करत होते. तर तो माल व्यापाऱ्यांना विकण्यास परावृत्त करण्यात येत होतं. मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व काही महाराष्ट्र सैनिक तेथे पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत नाफेडच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये अन्यथा गाठ मनसेशी असल्याचे ठणकावले.

मनसेच्या आक्रमक पावित्रा नंतर शेतकऱ्यांचा सर्व माल नियमानुसार खरेदी करण्यात येत आहे. मनसेच्या या पावित्र्या मुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली. शेतकऱ्यांना न्याय मिळताच तेथील उपस्थित शेतकऱ्यांनी मनसेचे आभार मानले.
Rokhthok News