Home Breaking News खासदार धानोरकरांना डीवचण्याचा प्रयत्न

खासदार धानोरकरांना डीवचण्याचा प्रयत्न

● घटक पक्षाला जागा सुटावी अशी खेळी..!

C1 20241022 14305827

घटक पक्षाला जागा सुटावी अशी खेळी..!

Sunil Naik Patil -| लोकसभे प्रमाणेच विधानसभेत काँग्रेस पक्षात आलबेल आहे असं दिसतं नाही. हरियाणा ची पुनरावृत्ती होईल असे चित्र आज दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला होता. त्या प्रमाणेच चंद्रपूर-आर्णी लोकसभेतील वणी, वरोरा या विधानसभेत जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध होत आहे. यामुळे घटक पक्षाला जागा सुटावी अशी खेळी तर नाही ना ही खमंग चर्चा रंगताहेत. Opposition within the party to a candidate who has the potential to win the assembly in Wani, Warora

चंद्रपूर-आर्णी लोकसभेतील निवडून येणाऱ्या महत्वाच्या विधानसभेवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला आहे. यात वणी व आपला परंपरागत मतदारसंघ वरोरा याचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास वणी विधानसभेत काँग्रेसला 1,25,781 मते तर 56,648 एवढे मताधिक्य होते. त्या प्रमाणेच वरोरा मतदारसंघात 1,04752 मते तर 37,050 मताधिक्य मिळाले. या दोन्ही मतदारसंघात खासदार धानोरकर सुचवतील तोच उमेदवार निवडून येण्याची शतप्रतिशत शक्यता असताना “त्या” उमेदवारांना विरोध का होतो हे कळायला मार्ग नाही.

वणी विधानसभे करिता संजय खाडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. तर वरोरा विधानसभेसाठी प्रवीण काकडे यांनी तयारी केलेली आहे . या दोन्ही ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट उमेदवाराची निवड होणे अपेक्षित आहे. सर्व्हेक्षणात संजय खाडे अव्वल आहेत त्यांचे जवळपास सुध्दा कोणताच नेता पोहचलेला नाही. जुन्या आणि त्याच त्या चेहऱ्याचा मतदारांना कंटाळा आला आहे. तरीही पक्षनेते मतदारांना गृहीत धारताहेत. मतदारांचा हिसका कसा असतो हे लवकरच दृष्टीपथात येणार आहे.

Img 20250103 Wa0009

वणी मतदारसंघावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना(उबाठा) ने दावा केला आहे. नेमका काय तिढा आहे हे कोडे असून वडेट्टीवार यांच्या डोक्यात काय शिजतंय हे कळायला मार्ग नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी सुपुत्री “शिवानी”ला उमेदवारी मिळावी म्हणून लॉबिंग केली होती. त्याचा वचपा काढण्याची हीच वेळ असल्याचे तर त्यांनी ठरवले नाही ना हा संशोधनाचा विषय आहे.
Rokhthok News