Home Breaking News कार्यकर्त्यांचा दावा…मुनगंटीवारच विजयी होतील..!

कार्यकर्त्यांचा दावा…मुनगंटीवारच विजयी होतील..!

● Exit poll म्हणजे मतदारांचं मत नव्हे ?

1184
C1 20240602 22535237

Exit poll म्हणजे मतदारांचं मत नव्हे ?

Sunil Patil- Wani | चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चांगलेच प्राबल्य आहे. मतदार सुज्ञ असून विकासाच्या दृष्टीने आपले मत मांडताना आजपर्यंत दिसून आले आहे. त्याप्रमाणेच या लोकसभा मतदारसंघाने कधीच जातीय समिकरणाला थारा दिला नाही. “निवडून तर येणार सुधीर मुनगंटीवार” असा दावा शिवसेना शिंदे गटाचे मनीष सुरावार यांनी केला आहे. Manish Surawar of Shiv Sena Shinde group has claimed that “Sudhir Mungantiwar will come if elected”.

Img 20250422 wa0027

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपची चांगली संघटनात्मक बांधणी आहे. बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्त्यांची फळी आहे. केळापूर-आर्णी, वणी व बल्लारपूर या विधानसभेत भाजपा प्रतिनिधित्व करताहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दोन्ही विधानसभेने मागील लोकसभा निवडणुकीत 59 हजाराच्या वर भाजप उमेदवाराला मताधिक्य दिले होते.

Img 20250103 Wa0009

सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे राज्यातील दुसऱ्या नंबर चे लोकनेते आहेत. उच्च शिक्षित, अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत, विकासाचं व्हिजन असणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांना ओळखणारा मतदार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आजोळ तर चंद्रपूर कर्मभूमी असल्याने दोन्ही जिल्ह्यात त्यांना मानणारा सर्वपक्षीय जनसमुदाय असल्याने त्यांचा विजय पक्का असल्याचं मत सुरावार यांनी व्यक्त केले आहे.
Rokhthok News

Previous articleExit polls | देशमुख, धानोरकर, आष्टीकर यांना कौल
Next articleपहिला कल, प्रतिभा धानोरकर आघाडीवर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.