Home Breaking News प्रबोधन, हास्‍य आणि नृत्‍यांची वणीकरांना मेजवाणी

प्रबोधन, हास्‍य आणि नृत्‍यांची वणीकरांना मेजवाणी

● तालुक्‍यात सेलिब्रिटींचा धडाका

C1 20231211 11445184

तालुक्‍यात सेलिब्रिटींचा धडाका

Wani News : तालुक्‍यातील राजकीय पुढारी आणि सामाजीक कार्यकर्त्‍यांत चांगलाच जोश संचारल्‍याचे दिसत आहे. शिंदोला येथे व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताहा निमीत्‍य आदर्श सरपंच भास्‍कर पेरे पाटील यांचे प्रबोधन 11 डिसेंबर तर 13 डिसेंबरला मनोरंजनात्‍मक, परखड किर्तनामुळे प्रसिध्‍दीच्‍या झोतात आलेले इंदुरीकर महाराज वणीत अवतरणार आहेत. महिन्‍याच्‍या अखेरीस वणीकर तरुणाईला नृत्‍यांच्‍या तालावर बेभान करण्‍यासाठी गौतमी पाटील येणार आहेत. Wanikars will be treated to a feast of enlightenment, laughter and dance in the month of December.

प्रबोधन, हास्‍य आणि नृत्‍यांची डिसेंबर महिन्‍यात वणीकरांना मेजवाणी मिळणार आहे. सोमवार दिनांक 11 डिसेंबरला गुरुदेव सेवा मंडळ व माऊली परिवार शिंदोला यांचे वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व व्‍यसनमुक्‍ती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या निमीत्‍ताने आदर्श सरपंच भास्‍कर पेरे पाटील हे गावविकासांच्‍या मुद्यावर विस्‍तृत विवेचन करुन ग्रामस्‍थांचे प्रबोधन करणार आहेत.

इंदुरीकर महाराज यांचे किर्तन म्‍हणजे लोटपोट हास्‍यांचे फवारेच असतात. महिलां, विद्यार्थी तर अबालवृध्‍दां पर्यत किर्तनातुन मारण्‍यात येणारे प्रबोधनात्‍मक फटकारे वणीकरांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथीचे औचित्‍य साधुन गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्‍यवर्ती बॅकेचे माजी अध्‍यक्ष टिकाराम कोंगरे यांच्‍या पुढाकाराने दिनांक 13 डिसेंबरला येथील शासकीय मैदानावर निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे.

Img 20250103 Wa0009

ऍड. कुणाल विजय चोरडीया यांचे अध्‍यक्षतेखाली पारसमल प्रेमराज ज्‍वेलर्स प्रस्‍तुत T-10 चॅम्पियन्‍स लीगचे सामने आयोजीत करण्‍यात आले आहे. या निमीत्‍ताने 29 डिसेंबरला प्रसिध्‍द नृत्‍यांगना गौतमी पाटील आपल्‍या दिलखेचक अदांनी तरुणाईला घायाळ करण्‍यासाठी येत आहे. येथील शासकीय मैदानावर बहारदार नृत्यांचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे.

डिसेंबर महिन्‍यात तालुक्‍यात सेलिब्रिटींचा धडाका बघायला मिळणार आहे. राज्‍यात नावलौकीकप्राप्‍त भास्‍कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन शिंदोला परिसरातील नागरीकांना होणार आहे. तर शहरात विनोदातून प्रबोधन हा निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांच्‍या किर्तनाचा गाभा असल्‍याने वणीकर हास्‍यरंगात लोटपोट होणार आहे. त्‍यासोबतच गौतमी पाटील यांचा संच आपल्‍या दिलखेचक अदांनी तरुणाईला घायाळ करणार आहे.
Rokhthok News