Home Breaking News वणीचे… गटविकास अधिकारी वनमंत्र्यांचे OSD

वणीचे… गटविकास अधिकारी वनमंत्र्यांचे OSD

● तडफदार अधिकाऱ्याला कामाची पावती ● BDO किशोर गज्जलवार यांची बदली

2738
C1 20231102 10122517
तडफदार अधिकाऱ्याला कामाची पावती
BDO किशोर गज्जलवार यांची बदली

Wani News | दोन वर्षांपूर्वी वणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ( BDO ) या पदावर किशोर गज्जलवार रुजू झाले होते. त्यांनी सर्वप्रथम प्रशासनिक शिस्त लावत अतिशय नियोजनबद्ध कामकाज केले. त्यांची प्रशासकीय काम करण्याची कार्यक्षमता लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची विशेष अधिकारी ( OSD ) म्हणून नेमणूक केली आहे. Considering his efficiency in administrative work, Forest Minister Sudhir Mungantiwar has appointed him as Officer on Special Duty (OSD).

Img 20250422 wa0027

गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी वणीत रुजू होताच ग्रामीण भागातील महत्वपूर्ण कामे मार्गी लावलेत. पंचायत समितीला शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे काटेकोर नियोजन करत अनेक विकासकामे पूर्णत्वास आणले. गावपातळीवर विविध अडचणींचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागतो. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यातील समन्वय साधून विकासकामांना गती कशी देता येईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

Img 20250103 Wa0009

गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष अधिकारी ( OSD ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना योग्य प्रकारे काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. वन विभागातील महत्वपूर्ण योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवता येणार आहे.
Rokhthok News