● शहरातील डासांचा प्रादुर्भाव, पाणीटंचाई, स्ट्रीटलाईट समस्यांसोडवा… अन्यथा…!
Political News :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणूक पार्श्वभूमीवर राजकिय पक्ष आक्रमक भूमिका अवलंबत आहे. माजी आमदार तथा शिवसेनेचे चंद्रपूर- यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांनी नगर परिषद व आगार प्रमुखांना सज्जड दम देत समस्यांचे निराकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनातून दिला आहे. Otherwise, a strong protest will have to be launched, warned
वणी-कोरपना मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. एक महिन्यापासून बस बंद असतानाही प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट शिवसेना माजी आमदार व चंद्रपूर-यवतमाळ जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांच्याकडे धाव घेतली.
नागरिकांची व्यथा ऐकताच नांदेकरांनी क्षणाचाही विलंब न करता बस स्थानक गाठले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी डेपो मॅनेजर यांनी बांधकाम विभागाच्या चुकीमुळे बस बंद असल्याचे सांगून प्रशासनाचे अपयश कबूल केले. मात्र नांदेकरांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “विद्यार्थ्यांचे नुकसान, नागरिकांची गैरसोय आम्ही खपवून घेणार नाही. बस सेवा तात्काळ सुरू झाली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल.”
दरम्यान, शहरातील डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया-डेंग्यूचा फैलाव, पाणीटंचाई व रात्री अंधारात वाढलेले अपघात-चोरी यावरूनही नांदेकरांनी नगरपरिषदेला सुध्दा धारेवर धरले. “फॉगिंग मशीन शहरभर फिरवून जनजागृती करा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नका. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा. स्ट्रीटलाईट बंद राहिल्याने अपघात व गुन्हे वाढले आहेत, तातडीने दिवे सुरू झाले पाहिजेत,” असा सज्जड दम त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनावेळी उमेश वैरागडे, शिवराज पेचे, प्रसाद ठाकरे, हिमांशु बोहरा, रोहित बुरांडे, अय्यान खान, साई अंदलवार, संदीप वाघमारे, विक्की चवणे, राहुल पारखी, कपिल कुंटलवार, विक्की भटगरे, हरीओम गेडाम, संकेत ठाकरे, शिवराम चिडे, मनोज लोये, मंगेश खाडे, लहानु सालूरकर, विजय गेडाम, नितीन वैद्य, रोहन पारखी, महेश चौधरी, राजु खामनकर, हरीश देऊळकर आदींची उपस्थिती होती.
ROKHTHOK