● जयस्वाल कुटुंबियांचे केले सांत्वन
Big News :
केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर अपघातात येथील “काशी शिव महापुराण” आयोजित करणारे राजा जयस्वाल, पत्नी श्रध्दा व चिमुरडी काशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने व्यथित झालेले पंडित प्रदीप मिश्रा वणीत जयस्वाल कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सोमवारी सायंकाळी आले होते. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले. Pandit Pradeep Mishra: Tears literally welled up in his eyes..!
राजकुमार जयस्वाल हे फार धार्मिक होते. त्यांनी वणीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या “काशी शिव महापुराण” चे आयोजन केले होते. तेव्हापासून ते कमालीचे प्रकाशझोतात आले होते. कोळसा व्यवसाय सांभाळत असतानाच ते धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असायचे. त्यांनी एक वर्षांत 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण करायचं ठरवलं होतं.
राजा जयस्वाल यांचे 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले होते. फक्त केदारनाथ बाकी होतं, दर्शनाला जाण्यासाठी राजा जयस्वाल, पत्नी श्रद्धा, मुलगी काशी 14 तारखेला केदारनाथला पोहोचले. ते जाताना सुद्धा हेलिकॉप्टरनेच गेले. सगळ्यांनी केदारनाथला दर्शन घेतलं आणि 15 जूनला पहाटे 5 वाजता गुप्तकाशीला जाणार होते.
पहाटे पाच वाजताच्या सुमारास राजा जयस्वाल, पत्नी श्रध्दा व चिमुरडी मुलगी काशी केदारनाथ मंदिरातून हेलिकॉप्टर ने गौरीकुंडला निघाले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात दुर्दैवी घटनेत सर्वांचा मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेने परिसरात कमालीची शोककळा पसरली. शिवभक्त राजा जयस्वाल, पत्नी श्रध्दा व चिमुरडी काशी यांच्या अनपेक्षित मृत्यूने समाजमन सुन्न झाले. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा Pandit Pradeep Mishra सोमवारी सायंकाळी वणीत आले होते. त्यांनी सर्व परिवारांचं सांत्वन केलं. मात्र ते आपले अश्रू लपवू शकले नाही. त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Rokhthok News






