● गळफास लावून तरुणांची आत्महत्या
SAD NEWS WANI : तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या डोर्ली गावात 27 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी माहेरी गेली होती तर आई-वडील शेतात असताना त्याने आत्मघात केला. ही बाब दिनांक 4 डिसेंबरला सायंकाळी उघडकीस आली. A 27-year-old youth committed suicide by hanging himself.

संदीप शालीक परचाके (27) असे मृतकाचे नाव आहे, तो रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचा. डोर्ली गावात तो आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले.
सायंकाळी आई-वडील शेतातून परतल्यावर त्यांना ही बाब कळली. त्यांनी एकच हंबरडा फोडला. शेजारीपाजारी जमा झाले. घटनेच्या बाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होवू शकले नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
Rokhthok News