Home Breaking News दणका…..वणीत पोलिसांची धडक कारवाई

दणका…..वणीत पोलिसांची धडक कारवाई

● धुमस्टाईल बायकर्सवर करडी नजर, दोन दुचाकीला 15 हजाराचा दंड, पालकांनाही इशारा

C1 20250902 14430918
Img 20250910 wa0005

धुमस्टाईल बायकर्सवर करडी नजर, दोन दुचाकीला 15 हजाराचा दंड, पालकांनाही इशारा

Wani News :
शहरातील मुख्य रस्त्यांवर बिनधास्त वेगाने रेसिंग करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वणी पोलिसांनी गस्तीदरम्यान जेरबंद केले. जैन ले-आऊट परिसरात पकडलेल्या या दोन्ही वाहनचालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्ससह आवश्यक कागदपत्रेही नव्हती. परिणामी पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त करून तब्बल 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली. Police crackdown in Wani, Fine of Rs 15,000 for two bikes

Img 20250103 Wa0009

पोलिसांनी चालक सतीश रामदास हिवरकर व सुखदेव सुनील भोयर दोघेही छोरिया लेआऊट, रा. गणेशपूर येथील निवासी आहेत यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक MH29CL1790 व MH29CG8758 जप्त केल्या आहेत. या दोन्ही दुचाकीवर तब्बल 15 हजार 500 रुपये दंड वाहतूक शाखेच्या माध्यमातून ठोठावण्यात आला आहे.

शहरात भरधाव दुचाकी वाहने हाकणाऱ्या बायकर्सचा उपदव्‍याप मोठया प्रमाणात वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी लोकमान्‍य टिळक महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकीच्या धडकेत नागो आवारी या पादचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. असे लहानसहान अपघात नित्‍याचेच झाले आहे. वाहतुक शाखा सपशेल अपयशी ठरल्‍याचे दिसत आहे.

आमदार देरकरांच्या समर्थकांचा शिवसेनेला “जयमहाराष्ट्र”

पोलिसांनी पालकांनाही इशारा दिला आहे की, आपल्या पाल्यांना रेसिंगसाठी वाहने देऊ नये. धुमस्टाईल, भरधाव वेगाने वाहने हाकल्यास नागरिकांच्या व स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होतोय. नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे अन्यथा कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Rokhthok