Home Breaking News तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

● स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.....

C1 20250619 07522678
स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले…..

Crime News :
लग्नाचे आमिष दाखवून व आत्महत्या करण्याची धमकी देत 24 वर्षीय युवकाने 19 वर्षीय तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. तिच्यासोबतचे अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. Pornographic photos and videos of young woman go viral on social media

रोशन विठ्ठल गोबाडे (24) असे आरोपीचे नाव असून तो वणी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. 19 वर्षीय तरुणीसोबत त्याची ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवले तसेच स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देत त्याने 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 दरम्यान तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आरोपी रोशन याने तरुणीच्या संमतीविना तिच्यासोबतचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ चित्रीत केले व नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करून तिची मानहानी केली. या गंभीर प्रकारामुळे तरुणी प्रचंड धास्तावली, मानसिक तणाव निर्माण झाला असून, तीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

Img 20250103 Wa0009

ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, (c).376 (2) (n) सहकलम 3 (1).4.5 (1), 6,11 (5), 12 पोक्सो सहकलम 66(E),67 (B), IT ACT प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rokhthok News