● पटाळा पुलावरून तरुणाची नदीत उडी..!
Sad News :
वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा गावाजवळील पुलावरून एका तरुणाने वर्धा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या तरुणाने टोकाचे उचलले. ही घटना मंगळवार दिनांक 27 ऑगस्टला सकाळी घडली. “Pranay” who left home never returned.
जैन लेआऊट, वणी येथील रहिवासी प्रणय संजय गोखरे (22) असे या तरुणाचे नाव असून, तो एमबीएचा विद्यार्थी असल्याची माहिती पुढे येत आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रागाच्या भरात घरातून मोटरसायकलवर निघून गेलेला प्रणय परत न आल्याने कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळी त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, त्याचे काही मित्र पाटाळा पुलाजवळ आले असता त्याची मोटरसायकल रस्त्यालगत उभी आढळून आली. शंका आल्याने मित्रांनी तातडीने महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता प्रणयने पुलावरून थेट वर्धा नदीत झेप घेतल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ उंबरकर घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, अभ्यासू व उत्साही तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलल्याचा घेतलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आहे. प्रणय चा अद्याप ठावठिकाणा लागला नाही यामुळे संपुर्ण परिवार मित्रमंडळी शोकसागरात बुडाले आहेत.
ROKHTHOK