Home Breaking News “प्यारा सजा है तेरा द्वार भवानी..” गायक लखबीरसिंग लक्खा यांचा बहारदार कार्यक्रम

“प्यारा सजा है तेरा द्वार भवानी..” गायक लखबीरसिंग लक्खा यांचा बहारदार कार्यक्रम

● औचित्य श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावनपर्वाचे

C1 20240802 09443773
औचित्य श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावनपर्वाचे

Wani News | “प्यारा सजा है तेरा द्वार भवानी..” सारख्या भक्ती गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लक्खा वणी शहरात भक्तीसंध्या हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावनपर्वात समाजसेवी तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांच्या आग्रहास्तव भाविकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येणार आहेत. “Pyara Saja Hai Tera Dwar Bhawani” singer Lakhbir Singh Lakha’s brave performance in Wani

“के जो केसरी के लाल”, “राम ना मिलेंगे हनुमान के बिना”, “खुश होंगे हनुमान राम राम किए जा” सारख्या अजरामर भक्ती गीतांनी भाविकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी लखबीर सिंग लक्खा व संच वणी शहरात येत आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावनपर्वाचे औचित्य साधून दिनांक 22 ऑगस्ट ला “भक्तिसंध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बहारदार भक्ती गीताचा कार्यक्रम येथील शासकीय मैदानावर होणार आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleतो..व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी..!
Next articleनदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.