Home Breaking News राज ठाकरे यांनी केला रणरागिनींचा सन्मान

राज ठाकरे यांनी केला रणरागिनींचा सन्मान

● अवैध दारू विक्री विरोधात फुंकले होते रणशिंग

C1 20240928 11480041

अवैध दारू विक्री विरोधात फुंकले होते रणशिंग

MNS NEWS WANI : मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री पकडुन ती जाळून नष्ट केली. दारू विक्री विरोधात धाडसी पाऊल उचलल्याने राज ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत कौतुक केले. यापूर्वी देखील मनसेचे राजू उंबरकर यांनी देखील या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले होते. Raj Thackeray honored women office bearers

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी आपल्या साहसाने आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजातील अवैध धंद्याविरुद्ध लढा दिला आहे. या कार्यामुळे त्यांनी आपल्या परिसरात एक अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे.

राज ठाकरे यांनी या महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आणि असे सांगितले की, समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, महिला शक्तीने केलेले हे कार्य समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009