● उंबरकर यांच्या प्रचाराचा फोडणार नारळ.
Political News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला आहे. विदर्भात पहिलीच सभा पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांच्या प्रचारार्थ 5 नोव्हेंबरला वणीत शासकिय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी राज ठाकरे सत्ताधारी व विरोधकांवर तोफ डागतील असे बोलल्या जात आहे. Raj Thackeray’s “zanzavati” tour continues in the wake of elections

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार तोफा राज्यात धडाडणार आहेत. यामध्ये सद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. विदर्भातील पहिलाच उमेदवार घोषित करून पहिलीच सभा होत असल्याने महाराष्ट्र सैनिकांत उत्साह संचारला आहे.
वणी विधानसभा निवडणुकीत सर्वार्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील धडाडीचा नेता म्हणून राजू उंबरकर यांना ओळखल्या जाते. तरुणांची मोठीफळी प्रचार यंत्रणेत सक्रिय झाली आहे. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद अवर्णनीय आहे. कामाचा माणूस मतदारांना हवा असल्याने निवडणुकीची रंगत कमालीची वाढली आहे.
वणीत शासकीय मैदानावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भव्य सभेला सुरूवात होणार आहे. या प्रसंगी जिल्ह्यांतील उमरखेड, राळेगाव, पुसद यासह विदर्भातील मनसे उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. प्रचारसभेत राज ठाकरे कोणाची लक्तरे वेशीवर टांगणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News