Home Breaking News पुसद अर्बनच्‍या उपाध्यक्षपदी ‘राकेश खुराणा’

पुसद अर्बनच्‍या उपाध्यक्षपदी ‘राकेश खुराणा’

● पाच वेळा संचालक म्हणून निवडून आलेल्या राकेश खुराणा यांना चौथ्यांदा....

उत्कृष्ठ कार्याची मिळाली पावती

Wani News | प्रतिथयश पुसद अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. पाच वेळा संचालक म्हणून निवडून आलेल्या राकेश खुराणा यांना चौथ्यांदा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. ही त्यांच्या उत्कृष्ठ कार्याची पावतीच म्हणावं लागेल. Rakesh Khurana was elected to the post of Vice President for the fourth time.

संपुर्ण राज्‍यात कार्यक्षेञ असलेल्‍या तसेच 37 शाखांचा कार्यविस्तार यशस्‍वीरित्‍या उतुंग शिखरावर पोहचविणाऱ्या पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच अविरोध पार पडली. बँकेचे कुशल अध्यक्ष शरद मैंद यांनी जुलै 2002 मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर आपल्‍या सहकारी संचालकांना विश्‍वासात घेत बँकेचा कार्यविस्तार संपूर्ण महराष्ट्रात वाढवला आहे.

ऍड अप्पाराव उपाख्य नाना मैंद यांनी लावलेल्‍या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. बॅकेचे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व संचालक मंडळानी समन्‍वय ठेवत ग्राहकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित आधुनिक सोयी सुविधा दिल्‍या. बॅकेने सामाजिक उपक्रमाअंतर्गत विविध कामे करून प्रशासनाला देखील सहकार्य केले आहे.

Img 20250103 Wa0009

राकेश खुराणा हे वणी विधानसभा मतदारसंघातील सामाजि‍क क्षेञात तडफेने कार्य करणारे नेतृत्‍व आहे. ते वणी शहराचे माजी नगराध्‍यक्ष होते, विविध संघटनेच्‍या माध्‍यमातुन जनहितार्थ उपक्रम सातत्‍याने राबवत असतात. सध्‍यस्थितीत व्‍यापारी असोशिएशनचे ते अध्‍यक्ष आहेत. पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Rokhthok News