● दुपारी दोन वाजता होणार अंत्यसंस्कार
Sad News : टिळक चौक येथील सत्यम हॉटेल चे संचालक रामकृष्ण त्रिवेदी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 80 होते, त्यांचेवर शनिवार दिनांक 13 जानेवारीला दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. Director of Satyam Hotel Ramakrishna Trivedi passed away after a long illness.

रामकृष्ण त्रिवेदी (80) हे हसतमुख व्यक्तिमत्त्व होते, त्यांचा जनसंपर्क अफाट होता. शहरातील मुख्य चौकात मागील 35 वर्षांपासून प्रसिद्ध असलेले सत्यम हॉटेल चे ते संचालक होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असून मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. दुपारी जिल्हा परिषद कॉलनीतील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)