Home Breaking News Sad news: मंगलबाबू चिंडालिया यांचे निधन

Sad news: मंगलबाबू चिंडालिया यांचे निधन

● हरहुन्नरी समाजसेवक हरपला

208
C1 20250520 11230648

हरहुन्नरी समाजसेवक हरपला

Sad News : येथील ज्येष्ठ व्यावसायिक, समाजसेवक आणि धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले मंगलबाबू चिंडालिया (वय 75) यांचे सोमवारी, दिनांक 19 मे रोजी रात्री 8 वाजता दुःखद निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते. Sad news: Mangalbabu Chindalia passes away

Img 20250521 wa0020

मंगलबाबू चिंडालिया यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. समाजकार्य, राजकारण, शिक्षण व धर्मकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Img 20250103 Wa0009

त्यांची अंतिम यात्रा मंगळवार, दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या छोरीया लेआउट येथील निवासस्थानाहून निघणार असून, अंतिम संस्कार वणीतील मोक्षधाम येथे होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा योगेश, सून, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. सत्शील, मनमिळावू आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मंगलबाबू चिंडालिया यांची समाजात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे वणी शहरात व परिसरात शोककळा पसरली असून, विविध स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)