● महाविकास आघाडीतील तिढा सुटला
सुनील पाटील | अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने अखेर बाजी मारली आहे. संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Sanjay Derkar’s candidature has been announced.

वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेस की शिवसेना (उबाठा) या घटक पक्षातील कोणाला उमेदवारी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. काँग्रेस पक्षाच्या अनेकांनी उमेदवारी मिळावी याकरिता फिल्डिंग लावली होती. तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून विश्वास नांदेकर, संजय निखाडे व संजय देरकर यांचा प्रबळ दावा होता. पक्षश्रेष्ठींनी विजयाची क्षमता लक्षात घेता संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजय देरकर यांच्या उमेदवारीमुळे वणी विधानसभा निवडणुकीत तुल्यबळ लढत होणार आहे. देरकर यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्यातच जातीय समीकरण त्यांच्या पथ्यावर पडणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच मनसेचे राजू उंबरकर, भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय देरकर यांच्यातील लढत रंगतदार होणार हे निश्चित.
Rokhthok News