Home Breaking News शिवसेना आक्रमक…रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी व वेकोलीच्या वाहतुकीवर प्रतिबंध..!

शिवसेना आक्रमक…रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी व वेकोलीच्या वाहतुकीवर प्रतिबंध..!

● भजन व रक्‍तदान करुन नोंदवणार निषेध

956

भजन व रक्‍तदान करुन नोंदवणार निषेध

Shivsena Wani News | उपविभागातील रस्त्यांची वेकोलीच्या बेजबाबदारपणामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. नव्यानेच बांधण्यात आलेल्या रस्त्याची वहन क्षमता आणि त्या मार्गावरून दररोज पाचपट वजनाची हजारो अवजड धावताहेत. प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्‍यामुळे शिवसेना आक्रमक झाली असुन रविवार दिनांक 13 ऑगष्‍टला शिवसेना उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्‍वात शिंदोला येथे भजन व रक्‍तदान करुन तिव्रस्‍वरुपाचे आंदोलन छेडण्‍यात येणार आहे. Under the leadership of Sanjay Nikhade, a severe agitation will be started at Shindola by singing bhajans and donating blood.

Img 20250422 wa0027

उपविभागात बांधण्यात आलेले रस्ते निकृष्ट की अवजड वाहनातून होणारी वाहतूक बेकायदेशीर हे तपासण्याची गरज निर्माण झाली असुन प्रशासन ठोस निर्णय घेतांना दिसत नाही. नव्‍यानेच बांधण्‍यात आलेला चारगांव ते शिंदोला हा मार्ग क्षतीग्रस्‍त होतांना दिसत आहे. दोन महिन्‍यात तब्‍बल 12 जणांनी आपले प्राण गमावलेत. वेकोलीच्‍या माध्‍यमातुन होणारी अवजड वाहनांची भरधाव वाहतुक खऱ्या अर्थाने याला कारणीभुत आहे.

Img 20250103 Wa0009

शिवसेनेचे उपजिल्‍हा प्रमुख संजय निखाडे यांनी यापुर्वी अनेकदा वरिष्‍ठ पातळीवर निवेदने दिलीत मात्र प्रशासन कोणतीही दखल घेतांना दिसत नाही. रस्‍तेबांधकामाची उच्‍चस्‍तरीय चौकशी व वेकोलीच्‍या अवजड वाहनांना प्रतिबंध घालावे अशी मागणी करण्‍यात आली होती. सोबतच विविध मागण्‍या रेटून धरण्‍यात आल्‍या होत्‍या. यावर कोणतीही उपाययोजना प्रशासनाने केली नाही. यामुळेच दिनांक 13 ऑगस्टला शिंदोला येथे सर्वसामान्य पीडित, बाधित नागरिकांसह शिवसेना( ठाकरे गट) तीव्र रास्तारोको आंदोलन छेडेल. याप्रसंगी कोणतीही अनुचित घटना घडल्यास वेकोली व प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.
● महत्वपूर्ण मागण्या ●
1) वणी उपविभागात धूलिकण प्रदूषण कमालीचे वाढले आहे. कोलगाव, मुंगोली व पैनगंगा कोळसा खाणी पासून शिंदोला पर्यन्त रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील पिके धूलिकण प्रदूषणाने बाधित झाले आहे. तरी त्याची मोका पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी.
2) पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून सुरू असलेली अवजड वाहनाची शिंदोला ते चारगाव मार्गाने होणारी वाहतूक बंद करावी
3) वेकोली अंतर्गत असणाऱ्या माती (OB) कंपन्या व कोळसा वाहतूक कंपन्यात भूमिपुत्रांना प्रधान्य द्यावे.
4) बेलोरा चेकपोस्ट जवळील राज्य मार्गावर ट्रक ची होणारी पार्किंग बंद करून वेकोलीने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी.
5) साखरा ते कोलगाव वेकोली अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण करावे.
6) कोलगाव ते चारगाव पर्यंत नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याचे बांधकाम करावे.
7) शिंदोला, आबई फाटा व चारगाव येथे गतिरोधक दयावे.
8) परप्रांतीय कामगार व वाहनचालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी.
9) उपविभागातून मार्गक्रमण करणाऱ्या 18, 16 चाकी वाहने आपली चार चाके उचलून चालत असल्याने रस्त्यांना क्षती पोहचते, त्यांचेवर कारवाई करावी.
Rokhthok News