Home Breaking News धक्कादायक: वीस वर्षीय तरुणांची आत्महत्या

धक्कादायक: वीस वर्षीय तरुणांची आत्महत्या

● का घेतला असा टोकाचा निर्णय

2658
C1 20231212 23282570

का घेतला असा टोकाचा निर्णय

suicide news : अवघ्या वीस वर्षीय तरुणाने घरी कोणीच नसल्याची संधी साधून गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही दुर्दैवी घटना शहरात मंगळवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली असून होतकरू तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. A young man of only twenty years took advantage of the fact that no one was at home and committed suicide by hanging himself.

Img 20250422 wa0027

अनिकेत विजय आवारी (20)असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आईसह शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी रात्री घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने घरातच गळफास लावून आपले जीवन संपवले.

Img 20250103 Wa0009

अनिकेत याने गळफास घेतल्याची बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. शेजारीपाजारी जमा झाले. घटनेची माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते इझहार शेख घटनास्थळी पोहचले. त्यांनी पारिवारिक मंडळींना सांत्वना देत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवला आहे. तरुणाने आत्महते सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News