● उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
Wani News | परिवहन महामंडळच्या बसेस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयात येण्या – जाण्यास अडचण निर्माण होत असून शालेय नुकसान होत होत आहे. यामुळे विद्यार्थीवर्ग प्रचंड संतप्त झालेला आहे. यामुळे तात्काळ बससेवा सुरू करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडावे लागेल असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. Bus service should be started otherwise MNS style agitation will have to be launched.

उकमी, पिंपळगाव तसेच वणी तालुक्यातील आजूबाजूंच्या गाव खेड्यातून शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान देखील होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊन भविष्य अंधारात आहे. त्यांना प्रशासनच शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचे वास्तव उजागर होत आहे.
तालुक्यातील गावांमधील विध्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (वणी आगार) यांच्याकडे बसच्या मागणी करिता यापूर्वी सुध्दा मनसेच्या माध्यमातून पत्र व्यवहार केले आहेत, परंतु अद्यापही विद्यार्थ्यांकरता बसेस सुरू केलेल्या नाहीत. आपल्यास्तरावरून तात्काळ वणी आगार प्रमुखांशी संपर्क साधून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 16 ऑगस्ट ला पीडित विध्यार्थी व पालकांसोबत उपोषणानाला बसणार असल्याचा इशारा गोहोकार यांनी दिला आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष धीरज पिदूरकर, विभाग अध्यक्ष आकाश नान्ने, दिलीप पेचे, सुरज काकडे, रुचिर वैद्य, धीरज बगवा, गणेश भोंगळे, वृषभ बदकी, मोहन खेडेकर, रोहन खाडे तसेच असंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Rokhthok News