Home Breaking News गळफास लावून विध्यार्थ्यांने संपवले जीवन

गळफास लावून विध्यार्थ्यांने संपवले जीवन

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

C1 20240911 00062896

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News | बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या घरी गळफास लावून जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना मंगळवार दिनांक 10 सप्टेंबरला सायंकाळी मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथे घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. Students ended their lives by hanging themselves

साहिल वामनराव डाखरे (18) असे मृतकाचे नाव आहे. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेचा बारावीतील विद्यार्थी होता. अतिशय संयमी, शांत व मृदू स्वभाव असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याचे मित्र प्रचंड हादरले आहेत. मागील काही दिवसांपासून तो कॉलेज मध्ये सतत गैरहजर राहत होता असे बोलल्या जात आहे.

घटनेच्या दिवशी आई-वडील व मोठा भाऊ शेतात गेलेले असताना त्याने घरीच गळफास लावला. घरची मंडळी शेतातून परतल्यानंतर त्यांना साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला. याबाबत स्थनिकांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. त्याचे पश्चात आई, वडील, भाऊ व मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009