Home Breaking News आणि… त्याने घरातच घेतला गळफास

आणि… त्याने घरातच घेतला गळफास

● मृत्यूचे कारण अस्पष्ट

C1 20231123 14313132

मृत्यूचे कारण अस्पष्ट

Sad News Wani | तालुक्यातील डोर्ली गावातील 30 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार दिनांक 22 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता उघडकीस आली. A 30-year-old man committed suicide by hanging himself in his residence.

निखिल विठ्ठल टोंगे (30) असे मृतकाचे नाव आहे. तो डोर्ली या गावातील निवासी होता. रोजमजुरी करून तो आपली उपजीविका करत होता. घटनेच्या दिवशी घरात कोणीच नसल्याचे बघून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ही बाब काही वेळाने पारिवारिक मंडळींना लक्षात येताच आरडाओरडा करण्यात आला. शेजारीपाजारी जमले, पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याने आत्मघातकी निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचे पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009