Home Breaking News Swatantra vir savarkar…स्वातंत्रवीर सावरकर हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व

Swatantra vir savarkar…स्वातंत्रवीर सावरकर हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व

● दयाशंकर तिवारी यांचे प्रतिपादन

313

दयाशंकर तिवारी यांचे प्रतिपादन

रोखठोक | धर्म की राष्ट्र याची निवड करायची वेळ आली तर आधी राष्ट्राची निवड करा असा स्पष्ट संदेश देणारे सैन्यशक्ती हिच राष्ट्रशक्ती असते हे ठासून सांगणारे स्वातंत्रवीर सावरकर हे या जगातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व होते. असे प्रतिपादन नागपूर चे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले ते वणी येथे आयोजित स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेनंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. Swatantraveer Savarkar was the unique personality in this world who asserted that military power is national power.

Img 20250422 wa0027

राहुल गांधी व इतर नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणाऱ्या अपमानाचा निषेध करण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समिती तर्फे रॅलीचे आयोजन करून जाहीर सभेत रूपांतरित झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे होते.

Img 20250103 Wa0009

याप्रसंगी व्यासपीठावर गौरवयात्रेचे आयोजक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, किरण बुजोणे, माधव सरपटवार, मुन्नालाल तुगणायत, संजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, शिवसेनेचे विनोद मोहितकर, मंगला पावडे, लिशा विधाते, संध्या अवताडे, स्मिता नांदेकर, आरती वांढरे, प्रामुख्याने उपस्थित होते.

येथील शासकीय मैदानातून स्वातंत्र्यवीर सावरकर भक्तांनी ‘होय मी सावरकर’ अंकित असलेल्या टोप्या व दुपट्टे घालून सावरकरांच्या प्रतिमेसह शहरातील प्रमुख रस्त्यावरून सावरकरांचा वारंवार होणाऱ्या अपमानाच्या विरोधात व मातृभूमीच्या सन्मानार्थ घोषणा देत पाण्याच्या टाकीजवळून निघालेली गौरव यात्रा टिळक चौकात येऊन जाहीर सभेत रूपांतरित झाली.

जाहीर सभेत या गौरवयात्रेच्या आयोजनामागील भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मांडली. त्यानंतर अपर्णा देशपांडे, अनुराधा वैद्य, सुप्रिया मेहता, डॉ. अमृता अलोणे, डॉ. ऐश्वर्या अलोणे, सागर मुने यांनी भारती सरपटवार यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर रचित जयोस्तुते, जयोस्तुते हे गीत सादर केले.

देश कधीच माफ करणार नाही
14 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या अनेक महान क्रांतिकारकामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशभक्तांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना हा देश कधीच माफ करणार नाही. असे स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मुख्य वक्त्यांचा परिचय माजी सभापती संजय पिंपळशेंडे यांनी करून दिला. उपस्थित सावरकर भक्तांना शपथ माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली. सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. आभार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांनी मानले.
वणी : बातमीदार