Home Breaking News “रुद्रा”चा अखेर मृतदेहच आढळला

“रुद्रा”चा अखेर मृतदेहच आढळला

● खेळता खेळता विहरीत पडला

C1 20240910 09313818

खेळता खेळता विहरीत पडला

Sad News | चिमुकला रुद्रा व त्याचा तीन वर्षीय लहान भाऊ स्वराज शेतात खेळत होते. त्यांचे आई- वडील शेतात निंदन करत होते. अचानक तो बालक बेपत्ता झाला. पोलिसांना कळविण्यात आले तर यवतमाळ येथील रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. शेतालगत असलेल्या विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. The body of little “Rudra” was finally found

वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुर्ली येथे वास्तव्यास असलेले संजय बोरकर व त्याची पत्नी किरण आपल्या दोन चिमुकल्या लेकरासह रविवारी सकाळी शेतात गेले होते. दोघे दाम्पत्य शेतकाम करत होते तर रुद्रा (6) व स्वराज (3) हे दोघे तेथेच खेळत होते. मात्र तीन वाजताच्या दरम्यान त्यांचा मोठा मुलगा रुद्रा अचानक बेपत्ता झाला.

लहानगा रुद्रा दिसेनासा झाला यामुळे त्याचे पालक कमालीचे घाबरले. सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो आढळून आला नाही. वडील संजय बोरकर यांनी वडकी पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. वडकी पोलिसांनी मुलाच्या छायाचित्रासह शोधपत्र जारी केले. सोमवारी सकाळी यवतमाळ येथून रेसक्यू पथकाला पाचारण करण्यात आले.

Img 20250103 Wa0009

रेसक्यू पथकाने शोधाशोध सुरू केली तसेच वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांची नजर लगतच असलेल्या शेतातील विहिरीवर खिळली. रेसक्यू पथकाने विहरीत गळ टाकून शो घेतला असता चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढताच आईवडिलांनी हंबरडा फोडला.या घटनेने सोनुर्ली गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News