Home Breaking News The burning truck…गंगा ट्रान्सपोर्टचा ट्रक पेटला

The burning truck…गंगा ट्रान्सपोर्टचा ट्रक पेटला

उष्णतेच्या दाहकतेचा परिणाम…!

वणी:- कोळसा खाणीत कोळसा भरण्याकरिता जात असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रक ची कॅबिन जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार दि.20 मे ला दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली.

वणी परिसरात असलेल्या कोळसा खाणीतून संपूर्ण देशात कोळसा वितरित केल्या जातो. खाणीतून ट्रक ने कोळसा खाणीच्या बाहेर काढल्या जातो.

तालुक्यातील घोंसा खुल्या कोळसा खाणीतून कोळसा आणण्यासाठी गंगा ट्रान्सपोर्ट कँपनी चा ट्रक क्रमांक
MH 29 BD 1393 हा गेला होता. ट्रक कोळसा खदानीजवळ पोहचताच शॉट सर्किट मुळे ट्रकच्या कॅबिन मध्ये आग लागली. चालक ट्रक सोडून खाली उतरला पाहता पाहता ट्रक ची पूर्ण कॅबिन जळून खाक झाली आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009