Home Breaking News आगीचे तांडव, गाव थोडक्यात बचावले

आगीचे तांडव, गाव थोडक्यात बचावले

● अंदाजे 30 ते 35 लाखाचे नुकसान ● सुदैवाने जीवितहानी टळली

3044
C1 20231114 07585253

अंदाजे 30 ते 35 लाखाचे नुकसान
सुदैवाने जीवितहानी टळली

Wani News | तालुक्यातील घोंसा या गावात मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, यात चार दुकाने भस्मसात झाली असून अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना दिनांक 14 नोव्हेंबर ला मध्यरात्री घडली. The fire caused an estimated loss of Rs 30 to 35 lakhs to four shops.

Img 20250422 wa0027

घोंसा या गावातील गजबजलेल्या व व्यासायिक बाजारपेठेत रात्री अचानक चार दुकानांना आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने चार दुकानांना कवेत घेतले. घडलेल्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे.

Img 20250103 Wa0009

आकाश इलेक्ट्रिकल, भांड्याचे दुकान, पान टपरी व सलूनचे दुकान भस्मसात झाले. दुकानांना आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसताच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग धगधगत होती. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

त्या दुकानांना आग लागली होती त्याचे लगतच लोकवस्ती आहे. सुदैवाने आगीने लोकवस्तीकडे प्रस्थान केले नाही. असे घडले असते तर गाव सुद्धा आगीच्या तडाख्यात आले असते. या घटनेत इलेक्ट्रिकल दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तो अपुरा पडत असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशाने लागली हे तापसानंतर स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News