Home Breaking News तेथे….शेतकऱ्याचे 90 हजार उडवले

तेथे….शेतकऱ्याचे 90 हजार उडवले

● दिपक टॉकीज परीसरातील घटना

C1 20250209 13171321

दिपक टॉकीज परीसरातील घटना

Wani News | कोरपना तालुक्यातील शेतकऱ्याने येथे कापूस विकला. चुकऱ्याचे 90 हजार रुपये पिकअप वाहनांच्या कंडक्टर साईडला असलेल्या डिक्कीत ठेवले. आणि ते दीपक टॉकीज परीसरात गेले. अज्ञात चोरट्याने त्या वाहनातील रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार दिनांक 8 फेब्रुवारीला घडली. The incident of looting the money from the vehicle took place on Saturday, February 8.

सचीन संजय देवतळे (26) रा. गाडेगाव ता. कोरपना जि. चंद्रपुर असे शेतकऱ्यांचे नाव आहे. त्याने आपल्या शेतातील कापूस पिकअप वाहनात भरून येथे आणला होता. कापसाचा चुकारा रुपये 90 हजार त्याने डिक्कीत ठेवले व तो वाहन घेऊन दीपक टॉकीज परीसरातील सनी बार परिसरात गेला.

अज्ञात चोरट्यांनी संधी साधत किंवा पाळतीवर राहत त्या पिकअप वाहनात ठेवलेले 90 हजार लंपास केले. या प्रकरणी वणी पोलिसात तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक धनंजय रत्नपारखी तपास करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009