● पन्नासाव्या वर्षात पदार्पण
Wani News | लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना 1975 ला झाली असून दोन्ही संस्था 50 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Organizing various programs on the occasion of the golden jubilee year
मंगळवार दिनांक 14 जानेवारीला दुपारी 4 वाजता लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय (नांदेपेरा मार्ग) येथे लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉ रीपल राणे यांच्या हस्ते, लायन भरत भलगट,कबीनेट सेक्रेटरी लायन अजय सिंग तसेच लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या अध्यक्षतेखाली, लायन्स शाळा व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, चार्टर्ड मेंबर लायन दत्तात्रय चकोर, लायन प्रमोद देशमुख व मान्यवरांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
शनिवार दिनांक 18 जानेवारला सकाळी 10 वाजता नागपूर येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन, राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांचे हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित प्रो डॉ प्रमोद गिरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, लायन श्रीकांत जोशी रिजन चेअरपर्सन, लायन दिपक मोरे झोन चेअरमन यांचे हस्ते लायन्स क्लब वणी चे माजी अध्यक्ष, माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षीस वितरण व विद्यार्थी स्नेहभोजन समारंभ संपन्न होणार आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 14 ते 18 जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी प्रश्न मंजुषा, चित्र व हस्तकला, पुष्परचना, रांगोळी, विज्ञान प्रदर्शनी,गायन, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमींनी या आयोजनाचा उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले व क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, व पदाधिकारी, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे यांनी केले आहे.
Rokhthok News






