Home Breaking News विषाचा घोट, वृद्ध शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

विषाचा घोट, वृद्ध शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

● शिरपूर परिसरातील घटना

शिरपूर परिसरातील घटना

Sad News | तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुर्ली येथे 65 वर्षीय वृद्धाने आपल्या शेतात विष प्राशन केले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ही घटना शनिवार दि. 8 जुलै ला सायंकाळी उघडकीस आली. The old man poisoned his farm He died on the spot.

भीमा किसन आत्राम (65) असे मृतकाचे नाव आहे ते कुर्ली येथील निवासी होते. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. शेतातच मागच्या वर्षातील उरलेल्या कीटकनाशकांचा डब्बा त्यांनी काढला व ते विषारी द्रव प्राशन केले.

कुर्ली शिवारातील शेतात त्यांनी विषाचा घोट पोटात रिचवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब लगतच्या शेतातील शेतकरी शेतमजूर यांना लक्षात येताच त्यांनी पोलीस पाटील व पोलिसांना सूचना दिली.

Img 20250103 Wa0009

ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व चार मुली असा आप्त स्वकीय परिवार आहे.
Rokhthok News