● अंगी प्रचंड जिद्द, मनात जनतेची नितांत आस्था, आणि डोळ्यांत बदल घडविण्याची स्वप्ने…..
जनतेच्या हितासाठी आयुष्य झोकून देणारे, राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे आणि प्रत्येक गरजूच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारे नाव म्हणजे “संजय पुरुषोत्तम निखाडे”. शिंदोला सारख्या छोट्याशा खेड्यातून आलेला एक तरुण… अंगी प्रचंड जिद्द, मनात जनतेची नितांत आस्था, आणि डोळ्यांत बदल घडविण्याची स्वप्ने. हा तरुण आज हजारो लोकांचा आधारस्तंभ झाला आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण वणी तालुक्यात जनतेच्या हृदयात घर केले आहे. “The only” leader who lives in the hearts of the people
13 ऑगस्ट 1972 रोजी चनाखा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले संजय निखाडे हे सन 1995 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जिल्हाप्रमुखपदापर्यंत पोहोचला आहे. पद कोणतेही असो, त्यांनी ते नेहमीच प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ भावनेने पार पाडले.
कोळसा खाणींच्या समस्या असोत, शेतकऱ्यांच्या हक्काचे लढे असोत, किंवा वीज व पाणी प्रश्नावर आंदोलने असोत संजय निखाडे नेहमी आघाडीवर. जनहितार्थ केलेल्या या लढ्यांमुळे त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना आणि सामान्यांना न्याय मिळवून दिला.
व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी घेतलेली भागवत सप्ताहांची प्रबोधनात्मक मोहीम, गरजू रुग्णांसाठी स्वखर्चाने उभी केलेली रूग्णवाहिका, आणि सलग 12 वर्षे चालत असलेले रक्तदान शिबिर या सर्व उपक्रमांतून त्यांच्या सेवाभावाची प्रचिती येते. सोबतच अवघ्या 54 वर्षात त्यांनी स्वतः 56 वेळा रक्तदान केलेलं आहे.
सामान्यांचा आधारस्तंभ बनलेले संजय निखाडे हे खऱ्या अर्थाने ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ या शिवसेना धोरणाचे जिवंत उदाहरण आहेत. गरिबांच्या दुःखात उभे राहणे, मदतीसाठी पहिला हात पुढे करणे, आणि लोकांच्या मनातील विश्वास जपणे हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य.
त्यांच्या नेतृत्वाखाली वणी तालुक्यातील जनतेला मिळालेला आधार, हे त्यांच्यावर असलेल्या प्रचंड जनविश्वासाचे द्योतक आहे. आज ते केवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नसून, हजारो लोकांच्या आशा-अपेक्षांचे केंद्रबिंदू आहेत.






