● ढोल ताशांचा गजरात आ. देरकरांचे भव्य स्वागत
Wani News | तालुक्यातील विरकुंड येथे दरवर्षी कबड्डीचे भव्य सामने आयोजित करण्यात येतात. यावेळी स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यात आली असून “आमदार चषक” कबड्डी सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेचे आ. संजय देरकर यांनी थाटात उद्घाटन केले. The thrill of kabaddi will be experienced in “Amdar Chashak”.
“आमदार चषक” सामन्याचे आयोजन विलास कालेकर व बजरंग क्रिडा मंडळाने केले. विरकुंड गावचे आराध्य दैवत असलेले हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करून आमदार संजय देरकर यांनी उद्घाटन केले. त्यानंतर शेकडो ग्रामस्थांसह गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. याप्रसंगी ढोल ताशांचा गजर व पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावर्षी “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण होत आहे. अशी कबड्डी स्पर्धा प्रथमच संपुर्ण विधानसभा क्षेत्रात प्रथमच होत आहे. याबद्दल विलास कालेकर यांचे आमदार संजय देरकर यांनी कौतुक केले. यावेळी आनंद शेंडे, महादेव धगडी, जगन जुनगरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देठे तर प्रमुख पाहुणे म्हणुन मोरेश्वर उज्वलकर, निलेश चौधरी, भगवान मोहीते, संजय साखरकर, विनोद ढुमणे व ईतर मान्यवर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कालेकर यांनी तर उत्कृष्ट शब्दाची उधळण करणारे देवेंद्र बच्चेवार यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.
Rokhthok News






