Home Breaking News Kabaddi : वणीत रंगणार कबड्डीचा थरार

Kabaddi : वणीत रंगणार कबड्डीचा थरार

● खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

C1 20250402 09304165

खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Wani News | दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सौजन्याने तीन दिवसीय भव्य “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्या चमुला दणदणीत बक्षिसाची लयलूट केली जाणार आहे. Three Day Grand MP Kabaddi Cup Courtesy of MP Pratibha Dhanorkar

दिवंगत बाळू धानोरकर हे क्रीडा प्रेमी होते, स्थानिक खेळाडूंना हक्काचं मैदान मिळावं, त्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवावी याकरिता त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी क्रीडा स्पर्धा घेतल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर क्रीडा स्पर्धा अविरत सुरू राहाव्या या करिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे.

वणी येथील शासकीय मैदानावर दि 4, 5 व 6 एप्रिल ला खासदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, नागपूर, बारामती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथील नामवंत संघ सहभागी होणार असून प्रथम विजयी संघाला 1 लाख, द्वितीय विजयी संघाला 71 हजार, तृतीय विजयी संघाला 51 हजार तर चतुर्थ विजयी संघाला 31 हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

Img 20250103 Wa0009

तसेच वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युवा नवरंग क्रीडा मंडळाचे सचिन टेकाम, आशिष धोंगडे, संदीप फटाले, विशाल नैताम यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rokhthok News