Home Breaking News भीषण…..ट्रॅक्टर पलटी, मलब्या खाली चालक दबला

भीषण…..ट्रॅक्टर पलटी, मलब्या खाली चालक दबला

● भालर मार्गावर घडली घटना

1822

भालर मार्गावर घडली घटना

Wani News | भालर मार्गावरून वणीकडे मलबा वाहतुक करणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत ट्रॅक्टर चालक मलब्याखाली दबला गेला यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. In this incident, the tractor driver was buried under the debris and he was seriously injured.

Img 20250422 wa0027

बाबाराव उत्तरवार (55) असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे, ते सेवा नगर परिसरातील निवासी होते. मूत्यलवार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर ते चालक म्हणून काम करत असताना दुर्दैवी घटना घडली. भालर मार्गावरून मलबा भरून ते वणीकडे येत असताना त्यांचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले यामुळे ट्रॉली पलटी झाली आणि ते त्या मलब्या खाली दबल्या गेले.

Img 20250103 Wa0009

ट्रॅक्टर पलटी झाल्याचे परिसरातील नागरिकांना कळताच मलब्याखाली दबलेल्या बाबाराव यांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेसीबीच्या साह्याने मलबा बाजूला सारून चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Rokhthok News

Previous articleथरारक…..शेतात वाघ…शेतकरी झाडावर
Next articleMNS aggressive… वेकोली प्रशासन नमले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.