Home Breaking News ‘ही’ लाट “त्सुनामी”त परावर्तित होणार…!

‘ही’ लाट “त्सुनामी”त परावर्तित होणार…!

● मतदारांनी ठरवले म्हणूनच मिळत आहे प्रचंड जनसमर्थन

C1 20251125

मतदारांनी ठरवले म्हणूनच मिळत आहे प्रचंड जनसमर्थन

Political News :
उत्स्फूर्त पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांचा जोश आणि भाजपच्या प्रचाराचा वेग पाहता आगामी निवडणुकीत पालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मतदारांनी ठरवले म्हणूनच ठिकठिकाणी प्रचंड जनसमर्थन मिळताहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांचा ग्राफ वाढला असून ही लाट “त्सुनामी”त परावर्तित होणार का ? हे कालांतराने स्पष्ठ होणार आहे. ‘This’ wave will be reflected in a “tsunami”…!

वणी शहरात भाजपचा प्रचार वेगाने जोर धरत असून शनिवारी रात्री मोमिनपुरा परिसरात शेकडो तरुणांनी अचानक भाजपात पक्षप्रवेश करून वातावरण अक्षरशः भारावून टाकले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम व नगरसेवक पदाचे उमेदवार आरती वांढरे, अनिल चिंडालिया यांच्या प्रचार दौऱ्यात तरुणांनी अनपेक्षितरित्या पक्षप्रवेश करून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विजयाची हमी दिली आहे.

विकासाच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही. पदावर नसतानाही शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा कायम ठेवला आहे. मोमिनपुरातील उर्वरित कामे पूर्ण करण्याचा शब्द याप्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्थानिकांना दिला. भाजपने राबवलेल्या धुंवाधार प्रचारयंत्रणा, दणदणीत रॅल्या आणि घराघरांत पोहचणाऱ्या संवादामुळे आता हवा ‘लाटे’मध्ये बदलत असून ती “त्सुनामी”त परावर्तित होणार असल्याचे खुलेआम बोलल्या जात आहे.

Img 20250103 Wa0009

प्रभाग 1 मधील उमेदवार मीनाक्षी शैलेश जुनघरे व उमाकांत महादेवराव जोगी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः घराघरांत जाऊन मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला होता. विकासकामे हीच खरी ओळख असल्याचा दावा करून पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. रॅलीदरम्यान नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले
ROKHTHOK