Home Breaking News पावसाचे थैमान …..तीन घरांची पडझड, नदी-नाल्यांना पूर

पावसाचे थैमान …..तीन घरांची पडझड, नदी-नाल्यांना पूर

● तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा

C1 20250709 21095073

तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा

Wani News :
वणी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे खांदला, निवली व वांजरी या गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. Three houses collapse, rivers and canals flood, heavy rains lash the taluka

खांदला येथील विठाबाई नानाजी राजूरकर, निवली येथील मनोज खिरटकर व वांजरी येथील बापूराव झिले यांचे घर पावसामुळे अंशतः पडले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने संबंधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.

तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आले असून, पाणी शेतांमध्ये घुसल्याने पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदतीची कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वणी तालुक्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009