Home Breaking News दहशत….येनक शिवारात वाघाचा ‘वावर’

दहशत….येनक शिवारात वाघाचा ‘वावर’

● गोठयातील जनावरांवर चढवला हल्‍ला

1383

गोठयातील जनावरांवर चढवला हल्‍ला

tiger attack news : तालुक्‍यात मागील काही महिन्‍यांपुर्वी वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. मानवासह पशुधनावर हल्ले चढवले होते माञ काही काळापासुन वाघांचा वावर दिसत नव्‍हता. सोमवारी पहाटे ये‍नक शिवारात गोठ्यात बांधलेल्‍या जनावरांवर वाघाने हल्‍ला चढवल्‍याची बाब समोर आल्‍याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. In the early hours of Monday morning, a tiger attacked animals tied in a cowshed in Yenak Shiwar.

Img 20250422 wa0027
kalvad
जखमी कालवड

येनक शिवारातील जंगला लगत राजु डाखरे व तातोबा बोंडे यांची शेती आहे. शेतीपयोगी साहित्‍य व जनावरांसाठी त्‍यांनी शेतातच गोठे बांधले आहे. नेहमी प्रमाणे त्‍यांनी शेतातील गोठ्यात आपली जनावरे बांधली व घरी परतले. सोमवारी पहाटे त्‍यांच्‍या शेतातील कालवड व एका बैलावर वाघाने हल्‍ला करुन जखमी केल्‍याचे निदर्शनांस आले.

Img 20250103 Wa0009

सोमवारी पहाटे ही बाब शेतकऱ्यांना कळताच त्‍यांनी वन विभागाला याप्रकरणी सुचना दिली. वन विभागाचे पथक घटनास्‍थळी पोहचले असुन पंचनामा करताहेत. येनक शिवारात वाघांचा संचार असल्‍याने ऐन खरिप हंगामात शेतकऱ्यांना दहशतीचा सामना करावा लागत आहे.
Rokhthok News

Previous articleविरोधक एकवटले तरी मतदान भाजपलाच
Next articleअजित जाधव वणीचे नवे ‘ठाणेदार’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.