Home Breaking News चक्क… टिळक चौकातच वाहतुकीचा “फज्जा”

चक्क… टिळक चौकातच वाहतुकीचा “फज्जा”

● अस्ताव्यस्त वाहतूक आणि कर्मचारी बिनधास्त

1440
C1 20240129 17194750
अस्ताव्यस्त वाहतूक आणि कर्मचारी बिनधास्त

Wani News : वाहतुकीला शिस्त लागण्याची आशा आता पुर्णतः मावळली आहे. उपविभागीय वाहतूक शाखा नेमकं काय करतंय हेच कळायला मार्ग नाही. “हार्ट ऑफ द सिटी” असलेल्या टिळक चौकात वाहतूक शिपाई मात्र अवैद्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला “अभय” देत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. The hope of disciplined traffic is now completely lost.

Img 20250422 wa0027

टिळक चौकातच वाहतुकीचा पुर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र दिसत असताना वाहतूक शाखा निव्वळ मिरवत असल्याचे सकृतदर्शनी दिसते. शहरात “श्री काशी शिवमहापुराण” सारखा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रवाश्यांची गर्दी वाढलेली आहे, यामुळे पूर्वाश्रमीची ढेपाळलेली वाहतूक व्यवस्था आता पुर्णतः लयास गेली आहे.

Img 20250103 Wa0009

टिळक चौकात रस्त्याचे बांधकाम होत आहे. असे असताना फुटपाथ वरील व्यावसायिकांनी ग्राहकांची वाहने योग्यरीत्या “पार्क” व्हावी याची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शाखा त्यांचेवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांवर आसूड का ओढल्या जातो हे न उलगडणारे कोडे आहे. “टार्गेट” च्या नावाखाली त्यांनाच बळीचा बकरा करण्यात येत आहे.

टिळक चौकापासून साई मंदिरापर्यंत एकेरी रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मार्गावर मात्र ट्रॅव्हल्स आणि प्रवाशी वाहनांची मक्तेदारी आहे. एकता नगर समोर अर्धवट बांधकाम झालेल्या रस्त्यावर ट्रॅव्हल्स उभी राहत असल्याने अपघाताची श्यक्यता बळावली आहे. सकाळी तर टिळक चौकातील वळणावरच ट्रॅव्हल्स उभी असते हे वाहतूक शाखेला दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीचा उडालेला बोजवारा संभाळण्यापेक्षा अवैद्य प्रवाशी वाहतुकदारांना दिलासा देणाऱ्या वाहतूक शाखेचा वणीकर नागरिकांना कवडीचाही फायदा नाही. यापेक्षा पूर्वीच बरं होतं असं म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. प्रवाशी वाहतूक करणारे थांबे आणि नियमबाह्य होत असलेली सर्वच वाहतूक याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News