
● गळफास लावून संपवले आयुष्य
Sad News :
वणी शहरातील मनसेच्या शहर संघटिका तथा माजी शहर अध्यक्ष व परिसरात हसतमुख स्वभावामुळे लोकप्रिय असलेल्या विद्या हिवरकर (45) यांनी मंगळवारी दुपारी आपल्या घरीच गळफास लावून आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात कमालीची शोककळा पसरली आहे. Tragic: MNS’s brave women’s winger Vidya Hivarkar commits suicide
कनकवाडी येथे वास्तव्यास असलेल्या हिवरकर या घरूनच लेडीज गारमेंट व्यवसाय करीत होत्या. परिसरात त्यांचा मोठा गोतावळा असून, समाजात सक्रिय सहभाग आणि धडाडीच्या वृत्तीमुळे त्यांची स्वतंत्र ओळख होती.
मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला. सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. त्यांच्या निधनाने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मनसेच्या कार्यकर्त्यांसह सर्वच स्तरातील लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.
विद्या हिवरकर यांच्या पश्चात पती सुधाकर हिवरकर, मुलगी प्रणाली, मुलगा मोहित तसेच मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. घटना उघडकीस येताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झाले नाही.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)