Home Breaking News TRENDING : सोशल मीडियावर ‘रेट्रो लूक’ची त्सुनामी

TRENDING : सोशल मीडियावर ‘रेट्रो लूक’ची त्सुनामी

● AI च्या जादूने पुन्हा रंगले 80चे दशक ! ● नेते, अभिनेते, पत्रकारांसह सर्वसामान्यांनाही 1980च्या दशकाचा मोह

C1 20260909

● AI च्या जादूने पुन्हा रंगले 80चे दशक !
● नेते, अभिनेते, पत्रकारांसह सर्वसामान्यांनाही 1980च्या दशकाचा मोह

Social media news :
TRENDING: Tsunami of ‘retro look’ on social media..कधी काय ट्रेंड येईल आणि तो सोशल मीडियावर कधी धुमाकूळ घालेल, याचा नेम राहिलेला नाही. मात्र, बुधवारी सकाळपासून समाजमाध्यमांवर सुरू झालेल्या ‘80 च्या दशकातील AI फोटो’ ट्रेंडने अक्षरशः सर्वांनाच भुरळ घातली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात AI च्या साहाय्याने स्वतःचा फोटो 1980 च्या दशकातील हिरो-हिरोईनच्या रूपात तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची जणू त्सुनामीच आली आहे.

या भन्नाट ट्रेंडमधून नेते, अभिनेते, पत्रकार आणि इतर मान्यवरही सुटलेले नाहीत. सर्वसामान्य नागरिक तर मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी झाले असून, प्रत्येकजण स्वतःला त्या काळातील चित्रपटातील नायक किंवा नायिकेच्या रूपात पाहण्याचा आनंद घेत आहे.

IMG 20261102 WA0001

मोठे केस, आकर्षक हेअरस्टाईल, बेलबॉटम पँट, रंगीबेरंगी शर्ट, साड्या, पारंपरिक दागिने, मोठे गॉगल्स आणि त्या काळातील खास पेहराव अशा विविध रूपांत आजचे चेहरे 80च्या दशकात गेल्याचे चित्र समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे.

Img 20250103 Wa0009

विशेष म्हणजे, या AI फोटोसोबत त्या काळातील गाजलेली जुनी गाणीही पुन्हा एकदा सोशल मीडियावर घुमू लागली आहेत. त्यामुळे एका क्लिकवर अनेकांच्या आठवणी ताज्या होत असून, जुन्या काळातील फॅशन, संगीत आणि चित्रपटसृष्टीचे सोनेरी दिवस पुन्हा जिवंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

“त्या काळातील हिरो-हिरोईन झालेत सारे…” अशी मजेशीर प्रतिक्रिया देत नेटकरी एकमेकांचे फोटो शेअर करत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह विविध समाजमाध्यमांवर सध्या 80च्या दशकातील फोटोच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे कल्पनांना नवे पंख मिळत असतानाच, हा ट्रेंड केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरत आहे. कधी काय ट्रेंड येईल हे सांगता येत नसले, तरी 80च्या दशकातील संगीत, फॅशन आणि पेहराव पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर जिवंत झाल्याचा आनंद मात्र सर्वांनाच होत आहे.
ROKHTHOK