● लालपुलिया परिसरातील घटना
Accident news wani | लालपुलिया परिसरातील श्रद्धा बिअर बार समोर सिमेंट भरलेल्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 12 मे ला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान घडली. Truck-bike accident, two killed

लालपुलिया परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात असलेल्या कोल डेपो मुळे अवजड वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. तसेच कोलडेपोतील कोळशाच्या साठवणूक व वितारणामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे वाहन चालकांना समोरील वाहनाचा अंदाज बांधता येत आहे.
शुक्रवारी सकाळी भरधाव ट्रक क्रमांक MH-34- BG-1983 व दुचाकी क्रमांक MH- 29-AH- 8391चा भीषण अपघात झाला यात अक्षरशः दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांची नावे कळू शकली नाही.
वणी : बातमीदार